scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
ganesh-naik
पुढील सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; वनमंत्री गणेश नाईक यांचे भाकीत

राज्यात सध्या मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या ध्वनिमुद्रित संभाषणाची चर्चा सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना…

Farooq Abdullah Pakistan remark political controversy | BJP demand sedition charge Farooq Abdullah | फारुक अब्दुल्ला पाकिस्तान विधान वाद | भाजप देशद्रोह गुन्हा मागणी फारुक अब्दुल्ला
फारुक अब्दुल्लांच्या पाकिस्तान कौतुकावरून वाद; ‘देशद्रोहाचा’ गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी; काँग्रेसची भूमिका काय?

अब्दुल्ला यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तर मित्रपक्ष…

Sonam Wangchuk Sri Lanka Bangladesh Comparison
‘…तेव्हा श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवते’; सोनम वांगचुक यांचं मोठं वक्तव्य

आंदोलकांवर केंद्र सरकारकडून कठोर कारवाई होत असल्याच्या मुद्यांवरून आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आक्रमक झाले आहेत.

UP Pilibhit Voter List Dispute Police Action
VIDEO : “मी इस्लाम धर्म स्वीकारेन”; सपा उमेदवार कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले; म्हणाले, “मला दहशतवाद्यासारखं…”

आपल्या समर्थकांना त्रास दिला गेल्याचं सांगत आकाश अग्रवाल हे ढसाढसा रडले आहेत. यावेळी अग्रवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

Naseeruddin Shah BJP Slams SRFTI protest updates | Naseeruddin Shah calls BJP Bloody Jhoothi Party
‘BJP, ब्लडी झूठी पार्टी’, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची घणाघाती टीका; सत्ता मिळाल्यानंतर सूड घेत असल्याचा केला आरोप

Naseeruddin Shah slams BJP: अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत भाजपावर ‘ब्लडी झूठी पार्टी’ अशी टीका केली.

MLA Anant Singh Neelam Devi Expelled From JDU
आमदार अनंत सिंह यांची जेडीयूमधून हकालपट्टी, बिहारच्या राजकारणात खळबळ, नितीश कुमारांनी का घेतला हा निर्णय?

जनता दल युनायटेड (JDU) पक्षाने मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

Chandrapur News
चंद्रपूर : पंतप्रधानांच्या ‘मन की बात’साठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना सक्ती; अनुपस्थित राहिल्यास भाजप आमदार कार्याध्यक्ष असलेल्या संस्थेचा दंडाचा इशारा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थिनींना सक्ती, अनुपस्थित राहिल्यास दंडाचा इशारा आणि त्यातही केवळ मुलींचीच…

Harshwardhan Sapkal Thane Press Conference | BJP Shinde Sena Conflict Statement | Maharashtra Congress Leader Criticizes Mahayuti | Eknath Shinde Srikant Shinde ED Enquiry Demand
भाजप-शिंदे सेनेत ‘टोळीयुद्ध’; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक! जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून सपकाळांची टीका

भाजप आणि शिंदे सेनेमध्ये टोळीयुद्धासारखी परिस्थिती सुरू आहे. मात्र, हे जनतेच्या प्रश्नांसाठीचे भांडण नसून सत्तेचा मलिदा खाण्यासाठी सुरू असलेले नाटक…

Prithviraj Chavan Statement Manoj Jarange
“मनोज जरांगे अन् एकनाथ शिंदेंचं नेतृत्व संपविण्याचा डाव”; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर म्हणाले…

मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या आरोपाच्या कथित ऑडिओ क्लिपवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Mira Bhayandar Corporation Shiv Sena Protest
भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन

मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत मागील आठवड्यात प्रेक्षक गॅलरीतून चित्रीकरण करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता.

ladki-bahin-yojana-pending-installments-whatsapp-application-government-clarification-maharashtra
Ladki Bahin Yojana: बंद झालेला हप्ता व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू होणार? लाडक्या बहिणींनो आधी हे ऐका|PK1

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचे बंद झालेले हप्ते पुन्हा…

Yusuf Pathan Vadodara Plot Controversy NDA news | Yusuf Pathan NDA Join Gujarat Land plot issue | युसूफ पठाण वडोदरा भूखंड वाद एनडीए प्रवेश | वडोदरा महानगरपालिका युसूफ पठाण जमीन प्रकरण
युसूफ पठाणला बडोद्यात १५ कोटींचं ‘गिफ्ट’! भाजपाने भूखंड ‘सरकारी जावयालाच’ का दिला? काँग्रेस आक्रमक; १४ वर्षांचा वाद ४ महिन्यांतच मिटला!

गेल्या १४ वर्षांपासून रखडलेला हा वाद अवघ्या ४ महिन्यांत कसा सुटला? यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून राजकीय वर्तुळात चर्चांना…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या