scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
महाराष्ट्र पोलीस ‘खलसंरक्षणार्थ’ काम करताहेत, प्रदिप पूर्णेकर हत्याकांडावरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

ठाण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदिप पूर्णेकर हत्याकांडातील मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

Akhilesh Yadav and Rahul Gandhi SP Congress seat sharing strategy in UP Assembly Election
SP-Congress Seat Sharing : उत्तर प्रदेश निवडणुकीत जागावाटपाचा पेच; अखिलेश यादव काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागांवर का मर्यादित ठेवू इच्छितात?

UP Election 2027 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष (सपा) आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे.…

India China Border Clash Arunachal
चीन सीमेवरील चकमकींवरून वाद

अरुणाचल प्रदेशात भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये अद्यापही चकमकी सुरू असल्याची माहिती भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी…

PM Narendra Modi addressing NDTV World Summit on Congress parasite remark | PM Narendra Modi attacks Congress party over intellectual Naxals | एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी | पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस परजीवी वक्तव्य आणि राजकीय वाद
Video : आंदोलनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं भाष्य; काँग्रेसवरही टीका, म्हणाले, “दिमागी नक्षलींनी…”

काँग्रेस आता ‘परजीवी’ पक्ष बनला असून देशातील सुधारणावादी आंदोलनांना व तरुण खासदारांना दाबण्याचे काम करत आहे, असा गंभीर आरोप मोदींनी…

Nagpur Graduate Voter Registration Scam Congress allegation | Atul Londhe press conference on voter list fraud | नागपूर पदवीधर मतदार नोंदणी घोटाळा काँग्रेस आरोप | अतुल लोंढे पत्रकार परिषद नागपूर पदवीधर निवडणूक
पदवीधरमध्ये मतदार नोंदणी घोटाळा? एकाच मोबाईल क्रमांकावरून २२ हजार मतदारांची नोंदणी, काँग्रेसचा दावा

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकाच मोबाईल क्रमांकावरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे…

Bihar Legislative Council elections NDA, Mahagathbandhanand Jan Suraaj party dynamics
Bihar MLC Election : बिहार विधानपरिषदेत एनडीएसमोर दुहेरी पेच; जेडीयूमधील नाराजी आणि जनसुराज्य पक्षाचे आव्हान कसे पेलणार?

Bihar Mlc Election : बिहारमधील विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेली निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांची कसोटी ठरणार आहे. बांकीपूरमधील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर…

Nitesh Karale expelled from NCP Sharad Pawar faction | Nagpur Graduate Constituency election rebel Nitesh Karale | नितेश कराळे राष्ट्रवादी हकालपट्टी कारवाई | नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक कराळे मास्तर
पदवीधरच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या अवघ्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाने) मोठी कारवाई केली आहे.

Priyanka Gandhi Post For Son
प्रियांका गांधींची मुलगा रेहानसाठी भावनिक पोस्ट, “सत्याची कास सोडू नकोस”; प्रदर्शनातले फोटो उतरवल्यानंतर काय घडलं?

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुलगा रेहानसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. तू कायम सत्याच्या बाजूने उभा राहा असं त्यांनी…

Amit Shah Rahul Gandhi Attack BJP Rule 30 Years Delhi News | Union Home Minister Amit Shah speech in Delhi on opposition and EVM | अमित शाह यांचा राहुल गांधींवर घणाघाती हल्ला | अमित शाह दिल्ली जल मंडळ कार्यक्रम भाषण
‘आंदोलन करून काहीही साध्य होत नाही’; अमित शाह यांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले, ‘३० वर्षे काँग्रेस सत्तेत येणार नाही’

दिल्लीतील जल मंडळाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी बोलताना शाह यांनी काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे पुढील ३० वर्षे भाजपाच केंद्र आणि विविध राज्यांत सत्तेत…

News About Rahul Gandhi
“राहुल गांधी पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत”; भाजपा आमदार परिणय फुकेंचा दावा

राहुल गांधी यांचं लग्न झालंय का मी सांगू शकत नाही. पण त्यांचा परिवार तिथे आहे हे फोटोंच्या माध्यमातून कळतं, शिवाय…

sudhir-dhone
“महिला व बालकल्याणाच्या योजना बंद, सत्ताधाऱ्यांचे पुतना मावशीचे प्रेम”, सुधीर ढोणेंची टीका

लाडक्या बहिणींचे मते घेत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे पुतना मावशीचे प्रेम उघड झाले, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

Rahul Gandhi Vietnam Tour News | Shashi Tharoor Statement On Rahul Gandhi | राहुल गांधी व्हिएतनाम दौरा बातमी | शशी थरूर राहुल गांधी ट्रॅव्हल एजंट वक्तव्य
राहुल गांधी यांच्या कथित व्हिएतनाम दौऱ्यावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी काही ट्रॅव्हल एजंट नाही’

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कथित व्हिएतनाम दौऱ्यावर शशी थरूर यांनी भाष्य करण्यास नकार देत ‘मी काही ट्रॅव्हल एजंट नाही’…

संबंधित बातम्या