scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
ganesh-naik
पुढील सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; वनमंत्री गणेश नाईक यांचे भाकीत

राज्यात सध्या मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या ध्वनिमुद्रित संभाषणाची चर्चा सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना…

Mira Bhayandar Corporation Shiv Sena Protest
भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन

मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत मागील आठवड्यात प्रेक्षक गॅलरीतून चित्रीकरण करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता.

BMC Sudhar Samiti meeting | Mumbai Municipal Corporation news | BJP opposes Shinde Sena | Worli land lease controversy
मुंबई: शिंदेंची शिवसेना एकाकी, सुधार समितीत नियमबाह्य प्रस्तावांना विरोधकांसह भाजपचाही विरोध, प्रस्ताव राखून ठेवण्याची अध्यक्षांवर नामुष्की

वरळीतील पालिकेच्या जागेचा पुनर्विकास, केईएम रुग्णालयातील औषधांचे दुकान चालवण्याच्या कंत्राटाला मुदतवाढ आणि वरळीतील पालिकेची जागा ३० वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव…

Shiv Sena Shinde faction delegation meets CM Devendra Fadnavis for audio clip probe | Forensic investigation request for Manoj Jarange audio clip Eknath Shinde | शिवसेना शिंदे गट ऑडिओ क्लिप चौकशी मुख्यमंत्री भेट | एकनाथ शिंदे मनोज जरांगे ऑडिओ वाद फॉरेन्सिक तपासणी
फॉरेन्सिक तपासणी करा; दोषींवर कारवाई करा! शिवसेना शिंदे पक्षाच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी शिवसेना शिंदे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सखोल फॉरेन्सिक…

Maharashtra Legislative Council elections Graduate Teacher constituency Voting Explainer
Maharashtra MLC Election : पाच जागा अन् बंडखोरीचे ग्रहण; महायुतीतील एकजूट टिकणार की मतभेद मविआच्या पथ्यावर?

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी. भाजपामधील अंतर्गत नाराजी, मित्रपक्षांमधील कुरबुरी आणि बंडखोरीच्या सावटामुळे महायुतीची एकसंधता टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

Thane Pradeep Purnekar murder case | Accused Santosh Kanojia Amit Singh court appearance | Thane police investigation Rajendra Shinde | Shiv Sena UBT leader murder updates
प्रदीप पूर्णेकर हत्याकांडातील आरोपी आज न्यायालयात होणार हजर

या प्रकरणी हत्येमागील मुख्य उद्देश आणि शस्त्रांच्या जप्तीसाठी पोलीस कोठडीत वाढ मागण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde | Maharashtra Political Controversy | Regime Change Debate Marathi News
सत्ताबदलावरून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे समोरासमोर; दोन्ही शिवसेनेत वादाचा नवा मुद्दा

ठाकरे आणि शिंदे यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांना स्थानिक प्रश्नापेक्षा यंदा राष्ट्रीय प्रश्नाला अधिक स्थान मिळाले आहे.

Eknath Shinde Angry in Dasara Melava
Video: “मला कोपऱ्यात कुणी टाकलं?”; एकनाथ शिंदे भाषणानंतर चांगलेच संतापले, दसरा मेळाव्यात काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसंच राहुल गांधींवरही टीका केली. पण भाषण संपल्यावर ते…

Sanjay Raut On PM Modi April Prediction
“पंतप्रधान मोदी एप्रिलमध्ये पदावरून जातील”; संजय राऊतांचा मोठा दावा

केंद्र सरकार एप्रिलमध्ये सत्तेतून जाईल. नरेंद्र मोदी एप्रिलमध्ये पदावरून जातील असा दावा संजय राऊत यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना केला…

Ramdas Kadam Criticized Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंची अवस्था शोले सिनेमातल्या जेलरसारखी, त्यांच्या मागे कुणीच उरलेलं नाही”; रामदास कदम यांची खोचक टीका

आज शिवतीर्थ मैदान जे शिवसेनाप्रमुखांनी ४० वर्षे गाजवलेलं मैदान आहे. त्यावेळी आम्ही म्हणत असू एक नेता, एक आवाज, एक मैदान…

Manoj Jarange Ramdas Kadam clash over 500 crore allegation | Ramdas Kadam reaction on Eknath Shinde allegations
मनोज जरांगेंच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपावर रामदास कदमांचे प्रत्युत्तर; तर अभिजीत दिपके शाळेतला मुलगा असल्याची टीका

Ramdas Kadam on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा गंभीर आरोप केल्यानंतर माजी…

Sanjay Raut Amit Shah Lawrence Bishnoi Statement
“अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत”; संजय राऊतांचं दसरा मेळाव्यात बोलताना वक्तव्य

खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यातील भाषणात बोलताना अमित शाह, एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

संबंधित बातम्या